महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:14 IST2019-05-28T22:14:23+5:302019-05-28T22:14:41+5:30
महापालिका : नळ कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी हाल

मनपाच्या प्रवेशद्वाराबाहेर डोक्यावर हंडा घेऊन निदर्शने करतांना महिला़संतप्त
धुळे : साक्रीरोड परिसरातील बजरंग सोसायटीसह इतर कॉलन्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन पालिकेचे नळ कनेक्शन दिलेले नाही़ कर भरून देखील पाण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत असल्याने संतप्त झालेल्या महिलांना मंगळवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढून निदर्शने केलीत़
बजरंग सोसायटी, भगवान सोसायटी, दिग्वीजय सोसायटी, महिंदळे शिवार तसेच अन्य काही भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच नळ कनेक्शनची व्यवस्था करण्यात आलेली नाही़ त्यामुळे परिसरातील नागरिकांना खाजगी विहीरीतुन तहान भागवावी लागते़ यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे येथील विहीरींनी तळ गाठला आहे़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वलवाडीसह अन्य परिसरात महापालिकेव्दारे पाणीपुरवठा केला जात नसतांना देखील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली केली जाते़ महापालिका प्रशासनाकडून नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ मात्र अद्यापही प्रश्न सुटू शकलेला नाही़ सध्या उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे़
अशा कडक उन्हात पाण्याचा शोर्धात नागरिकांना पाण्यासाठी फिरण्याची वेळ येवून ठेपली आहे़
निवेदनावर प्रतिभा सोनवणे, रत्ना सोनवणे, मीनाबाई शिंदे, भटाबाई पाटील, कमला गुरव, आशा गवळी, अक्का पाटील, संगिता पाटील, मंगला ठाकरे आदींच्या स्वाक्षºया आहेत़