शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी कायद्याची अंमलबजावणी सक्षम करण्याकरिता सामूहिक प्रयत्न करावेत- आ. डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 23:26 IST

निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे सरकारकडून सक्षम करण्यात आलेत आहेत. यातून मोठ्या शहरांमध्ये तक्रार नोंदविण्यामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धुळे : निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे सरकारकडून सक्षम करण्यात आलेत आहेत. यातून मोठ्या शहरांमध्ये तक्रार नोंदविण्यामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपल्या कुठल्याही हलगर्जीपणामुळे जर एखाद्या महिलेस न्याय मिळत नसेल तर भारतीय लोकशाहीकरिता अयोग्य आहे. त्यामुळेच कायदा सक्षम करण्याकरिता महिलांनीच सामूहिक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आ. डॉ नीलम गोऱ्हे यांनी धुळे येथील महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्र तथा देशबंधू व मंजू गुप्ता फाऊंडेशन आयोजित महिला कायदेविषयक कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी माजी आमदार शरद पाटील, महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, रावसाहेब बढे, अ‍ॅड. रसिका निकुंभे, डॉ. हेमंत भदाणे आदी उपस्थित होते.आ. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर व कोर्टात प्रकरण सुनावणीस आल्यानंतर केस कमकुवत होऊन आरोपी सुटतो. अ‍ॅड. उज्ज्वल निकम, अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद वगळता सरकारी वकील देखील बलात्काराचे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळत नाही. न्याय मिळण्याकरिता कायदेविषयक अंमलबजावणी निर्दोष आणि अचूक व्हावी.जळगाव वासनाकांड तसेच कोठेवाडी बलात्कार प्रकरणाच्या आठवणी यावेळी उपस्थितांपुढे मांडल्या. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, कोठेवाडी खटला हा एक आव्हान होते. महिला संघटनांकरिता तर ही घटना अस्मितेचा विषय होती. समाजात रोज वाढत्या प्रमाणात घडणाऱ्या बलात्कार व विनयभंगाच्या घटनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे म्हणाल्या, महिला सहन करते हा समज समाजाने बदलला पाहिजे. आज संघर्षातून पुढे येऊन महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. कायदे अनेक आहेत पण ते महिलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आज महिला न्याय हक्कांसाठी लढत आहेत. महिला आयोगाच्या सध्या चालू असेलेल्या अनेक उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली व आयोग आता गावात गावात पोहोचत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी दोंडाईची गावातील घडलेल्या पाच वर्षांच्या बालिका अत्याचार प्रकरणात आ. डॉ. गोऱ्हे यांना भाजपाच्या महिला आघाडीच्या व सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देऊन या प्रकरणी न्यायाची मागणी करण्यात आली. या एकदिवसीय कार्यशाळेत महिलाविषयक कायदे यावर गटचर्चा घेऊन महिलांचे या कायद्यांवरचे मत जाणून घेण्यात आले. यात महिला सुरक्षाविषयक कायदे- वासंती दिघे, कौटुंबिक हिंसाचार विषयक कायदे सुधारणा शिफारशी तसेच डाकीण प्रथा प्रतिबंधाची गरज, आदिवासी समाजातील विशेष समस्या, द्विभार्या प्रतिबंधक कायदा यावर मालती वाळवी ,विवाह विषयक कायदे, बालविवाहाचा प्रश्न अ‍ॅड. रसिका निकुंभ यांनी बाल बालिका शोषण व व्यापार यांचे इंदिरा पाटील व बचतगटांचे काम व कायदेविषयक साक्षरता यावर -पल्लवी आवेकर व प्रियांका घाणेकर यांनी विचार मांडले. या विषयांवर गटचर्चेच्या माध्यमातून ऊहापोह करण्यात आला. यातील महत्वाच्या शिफारशी केंद्रातर्फे राज्य महिला आयोगाला सादर करण्यात येतील. द्विभार्या गुन्हा दखलपात्र करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रावसाहेब बढे यांनी स्वागतपर भाषण केले तसेच डॉ. हेमंत भदाणे व अ‍ॅड. रसिका निकुंभ यांनी देखील मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हातून सामाजिक कार्यकर्ते, वकील व महिला उपस्थित होत्या.बलात्कारपीडित महिलांसाठी मेडिकल प्रोटोकॉलची आवश्यकता तथा स्त्री आरोग्याचे प्रश्न व हिंसाचार या विषयावर डॉ.चारुलता पवार यांनी सविस्तर माहिती दिली. मेडिकल प्रोटोकॉलच्या अंमलबजावणी राज्यभरात योग्य होत आहे किंवा कसे या करिता स्त्री आधार केंद निर्भय दृष्टी अभ्यास राज्याच्या दहा जिल्ह्यात राबविला जाणार आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे