कोरोनाबाधीत महिला काही तासात निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 22:18 IST2020-06-16T22:17:34+5:302020-06-16T22:18:03+5:30

शिरपूर : प्रशासन अनभिज्ञ, बाधित महिलेचे गावात स्वागत, आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद

Women with coronary artery disease are negative within a few hours | कोरोनाबाधीत महिला काही तासात निगेटिव्ह

कोरोनाबाधीत महिला काही तासात निगेटिव्ह

शिरपूर : तालुक्यातील करवंद गावात पीठ गिरणी चालक व ब्युटीपार्लर असलेल्या पती-पत्नी हे दोघे कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच ती महिला घरी पोहचली़ विशेषत: आरोग्य विभागाच्या रूग्णवाहिकेने तिला घरपोच केल्यानंतर गावात स्वागत झाले़ मात्र, बाधित महिला असतांना अवघ्या काही तासातच निगेटिव्ह कशी झाली? असा प्रश्न गावात चर्चिला जात आहे़
१३ रोजी रात्री उशिरा करवंद येथील पती-पत्नी असलेले अनुक्रमे ३५ व ३२ वर्षीय दोघाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता़ त्या पुरूषाचा पिठ गिरणीचा तर महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडे गावातील अनेकजण संपर्कात आले आहेत़ गावातील काही लोकप्रतिनिधींचा पिठ गिरणीच्या बाहेर बसण्याचा त्यांचा ठिय्या होता़ ते दोघे बाधित असल्याचा अहवाल प्राप्त होताच गावपुढारी धस्तावले़ १४ रोजी तहसिलदार आबा महाजन यांनी करवंद ग्रामपंचायतीत बैठक घेवून कोरोना संदर्भात सूचना दिल्यात़ १४ ते १६ दरम्यान गावातील जिवनावश्यक दुकाने, मेडिकल व कृषी दुकाने वगळता अन्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला़
दरम्यान, १५ रोजी रात्री सदर बाधित महिलेला डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले़ त्यानंतर गावातील काहींनी तिचे स्वागत केले़ मात्र बाधित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडून प्राप्त झाला असतांना अवघ्या काही तासातच त्या महिलेला अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून घरी सोडण्यात आले़ पुन्हा तिला कोविड सेंटरला घेऊन जाण्यासाठी आरोग्य कर्मचारी आल्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली़
बाधित महिलेला घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी गेले होते, मात्र नकार दिल्यामुळे ते रिकाम्या हाती परतले होते़
सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पुन्हा तहसिलदार आबा महाजन, बीडीओ युवराज शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, नोडल आॅफिसर डॉ़अनिल पाटील असे अधिकारी करवंद येथे गेले असता त्या महिलेला समजूत घालुन खबरदारीचा उपाय म्हणून शिंगावे येथील कोविंड सेंटरला दाखल करण्याचे सूचित केले़ यापूर्वीच, त्या महिलेचे मुलगा व मुलगी येथील कोविड सेंटरला दाखल आहेत़
शासनाच्या नियमानुसार बाधित रूग्णांना लक्षणे न दिसल्यास त्यांना आता घरीच होम क्वॉरटॉईन केले जाईल़ त्यामुळे महिलेला सोडण्यात आले होते़

Web Title: Women with coronary artery disease are negative within a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे