धुळ्यात लॉजमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:12 IST2019-02-18T23:02:33+5:302019-02-18T23:12:03+5:30

खंडेराव बाजार चौकातील घटना

The woman was killed in a lodge in Dhule Dhule | धुळ्यात लॉजमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या

dhule

धुळे : शहरातील खंडेराव बाजार चौकातील राजस्थान लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़
शहरातील खंडेराव बाजार परिसरातील राजस्थान लॉजमध्ये सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सुरेश निळे रा. वरखेडी हे आपल्या पत्नीसोबत आले. त्यांनी एक रुम बुक केली. कारण लग्नानिमित्ताने आल्याचे दाखविले. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सुरेश निळे हे एकटे खाली आले. मेडिकलमध्ये जातो असे सांगून बाहेर गेले. ते लवकर परतले नाही. तेव्हा संशय आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याने वरती रुममध्ये जाऊन बघितले असता गळा चिरुन महिलेचा खून केल्याचे दिसून आले. नंतर सुरेश निळे यांचा शोध घेतला असता ते फरार झाले होते.
पोलिसांना कळविल्यानंतर उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले़ आता वरखेडी गावात जाऊन सुरेश निळे या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहे.

Web Title: The woman was killed in a lodge in Dhule Dhule

टॅग्स :Dhuleधुळे