नाणे फाट्याजवळ अपघातात विंचूर येथील महिला ठार, अन्य तिघे जखमी Inbox
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:57+5:302021-07-18T04:25:57+5:30
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, विंचूर येथील शेतकरी भालचंद्र बंडू पगारे हे सकाळी १० वाजेच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एमएच ...

नाणे फाट्याजवळ अपघातात विंचूर येथील महिला ठार, अन्य तिघे जखमी Inbox
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, विंचूर येथील शेतकरी भालचंद्र बंडू पगारे हे सकाळी १० वाजेच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एमएच १८ - २७६० वर पत्नीसह दोघे नातांना घेऊन शेतात काम करण्यासाठी निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग बोरी नदीवरील पूल ओलांडून नाणे फाट्याच्या थोडे पुढे गेल्यावर त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी वळण घेत असताना चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एचआर ५५ एएच २७५२ ची मागून धडक बसली असता अलकाबाई भालचंद्र पगारे (वय ५१) यांच्या पायास गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाल्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचे पती भालचंद्र पगारे (६०) हे गंभीर जखमी झाले आहेत व त्यांच्या नाती दिव्या नितीन पगारे (९) व कावेरी समाधान पगारे(३) या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींना नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, झालेल्या या घटनेबद्दल विंचूर पंचक्रोशीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.