ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 21:44 IST2021-01-29T21:43:55+5:302021-01-29T21:44:16+5:30

देवपुरातील घटना, हळहळ

Woman killed in tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार

धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने पुढे जाणाºया दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला खाली पडल्याने गंभीर दुखापती झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना देवपुरातील तुळशिराम नगर रिक्षा स्टॉपजवळ गुरुवारी दुपारी घडली.
देवपुरातील तुळशिराम नगर रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या उत्कर्ष डेअरी समोरुन एमएच १८ बीएस २५७४ क्रमांकाची दुचाकी जात असताना त्याचवेळेस दुचाकीच्या पाठीमागून एमएच ४१ एए ८१७९ क्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने आले. दुचाकीला ट्रॅक्टरची धडक लागली. या अपघातात अलकाबाई दगडू खोंडे (४८, रा. वाडीभोकर) ही महिला खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना गुरुवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली. तातडीने तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी दीपक दगडू खोंडे (३१, रा. वाडीभोकर) यांनी देवपूर पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ट्रॅक्टरचालक बापू पुना गोपाळ (रा. नगावबारी) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक पोतदार घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Woman killed in tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे