कार-दुचाकी अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 22:27 IST2021-01-16T22:27:34+5:302021-01-16T22:27:50+5:30
धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद

कार-दुचाकी अपघातात महिला ठार
धुळे : भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात तालुक्यातील वणी बुद्रुक येथे झालेल्या अपघातात महिला ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. १४) सायंकाळी घडली. या प्रकरणाची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली. धुळे शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ मधील क्वॉर्टरमध्ये राहणारे सेवानिवृत्त सुभाष गणपत सोनार हे पत्नी निर्मलाबाई यांच्यासह मोटारसायकलीने (एमएच १८ एएम ०४१०) धुळे तालुक्यातील वणी येथून धुळ्याकडे येत हाेते. त्याच वेळेस कार (एमएच १८ एजे ७५१६)ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात निर्मलाबाई सोनार या गंभीर जखमी झाल्याने जागीच मरण पावल्या. अपघाताची ही घटना धुळे तालुक्यातील वणी बुद्रुक गावाजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती पाेलिसांना न देता वाहनचालकाने पळ काढला. या प्रकरणी दुचाकीचालक सुभाष सोनार यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.