बारा तासात त्या गटारीची झाली दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:06 IST2019-11-12T12:05:27+5:302019-11-12T12:06:07+5:30
महापालिका : ग़ द़ माळी सोसायटी

dhule
धुळे : देवपूरातील ग़द़ माळी सोसायटीत जलवाहिनी गटारीत असल्याने नागरिकांना अशुध्द पाणी पुरवठा केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिध्द केल्यानंतर मनपाने अवघ्या बारा तासात गटारीची दुरूस्ती करण्यात आली़
ग़ द़ माळी सोसायटीत ज्या जलवाहिनीव्दारे अनेक प्रभागात पाणी पुरवठा केला जातो़ त्याच्या दुरुस्तीचे काम काही दिवसापासून सुरु होते. त्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्यातून पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी गटारीजवळ असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी मनपाच्या कारोभाराविषयी नाराजी करीत परिसरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी गटारीची तत्काळ दुरूस्तीची मागणी केली होती़ यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.
वृत्ताची दखल घेत प्रशासनाने सोमवारी सकाळी ११ वाजता गटारीची तातडीने बांधकाम करून त्याची दुरूस्ती केली़ परिसरातील नागरिकांनी यासाठी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.
अन्य ठिकाणी दुरूस्तीची गरज
शहरातील व्हॉल्व व जलवाहिनीवरील गळीत यामुळे अनेकठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे़ याकडे मनपा कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे.