शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

अवघ्या तीन दिवसात लुटारु जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 10:29 PM

स्थानिक गुन्हे शाखा : २ कोटी ६५ लाखांचे दागिने जप्त, तिघांच्या मुसक्या आवळल्या

धुळे : अंधाराचा फायदा घेत एका सराफ व्यापाºयाला मारहाण करुन त्याच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री देवपुर भागात घडली होती़ यात तिघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे़ त्यांच्याजवळून २ लाख ६५ हजार १०० रुपयांचे दागिने हस्तगत केली आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी दिली़ देवपुरातील पितांबर नगरात सोने-चांदीचे व्यापारी गोपाल सोनार यांनी रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन दागिने बॅगमध्ये भरले़ ते घरी जात असताना अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकलीवर आलेल्या लुटारुंनी त्यांना अडविले़ मारहाण करीत त्यांच्याकडील बॅग लांबविली होती़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश बोरसे, हनुमान उगले, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, गौतम सपकाळे, उमेश पवार, विशाल पाटील, रविकिरण राठोड, तुषार पारधी, किशोर पाटील, मनोज बागुल, श्रीशैल जाधव, राहुल सानप, मयूर पाटील, केतन पाटील, महेश मराठे, दीपक पाटील यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला़ त्यानंतर मधुकर राजाराम वाघ, बापू उर्फ दीपक विठ्ठल वाणी, सुनील गुलाब मालचे या तिघांना शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळविले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी लूट केल्याची कबुली दिली आहे़ त्यांच्याजवळून ४१़६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ किलो ९६३ ग्रॅम ६९० मिली वजनाची चांदी असे एकूण २ लाख ६५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ दरम्यान, लुटीच्या या गुन्ह्यात आणखी संशयित वाढण्याची शक्यता डॉ़ भूजबळ यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी