पोलीस कर्मचारीवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:11 IST2021-03-28T21:11:33+5:302021-03-28T21:11:49+5:30

मराठा क्रांती मोर्चा : एसपी कार्यालयाबाहेर निदर्शने

Withdraw suspension action against police personnel | पोलीस कर्मचारीवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

पोलीस कर्मचारीवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

धुळे :  येथील जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेडकाॅन्स्टेबल वसंत गोकुळ पाटील यांच्यावरील अन्यायकारक निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. 
यासंदर्भात शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याने वसंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्याबाबत कोणतीही चाैकशी न करता माजी आमदार अनिल गोटे यांचे पत्रक प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी. त्यांनी राजीनामा का दिला, याची सखोल चाैकशी करावी. मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची चाैकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे, कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, संदीप शिंदे, संदीप सूर्यवंशी, लहू पाटील, नाना कदम, नितीन पाटील, वीरेंद्र मोरे, अमर फरताडे, सचिन मराठे, संदीप पाटोळे, हेमलता हेमाडे, वामन मोहिते आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Withdraw suspension action against police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे