इंडस्ट्रिअल काॅरिडाॅरसाठी प्रशासनावर दबाव आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:59+5:302021-07-18T04:25:59+5:30
धुळे : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया लवकर सुरू करावी म्हणून प्रशासनावर राजकीय, सामाजिक दवाब निर्माण करण्याचा निर्णय ...

इंडस्ट्रिअल काॅरिडाॅरसाठी प्रशासनावर दबाव आणणार
धुळे : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया लवकर सुरू करावी म्हणून प्रशासनावर राजकीय, सामाजिक दवाब निर्माण करण्याचा निर्णय काॅरिडाॅर विकास प्रकल्प समितीने घेतला आहे. कोअर कमिटी सदस्य औरंगाबाद जिल्ह्यातील कॉरिडॉर प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी दौरा करणार आहेत. कॉरिडॉर कमिटीमध्ये सर्व जाती, धर्म, सामाजिक, राजकीय लोकांना सहभागी होण्याचे आवाहन रणजितराजे भोसले यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून कॉरिडॉर प्रकल्प विकास समिती गेल्या चार वर्षांपासून काम करीत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पासंदर्भात मंत्रालयामध्ये उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली होती. याबाबत जिल्ह्यातील कोअर कमिटीच्या सदस्यांना माहिती देण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी बैठक झाली. बैठकीत कोअर कमिटीचे दिवंगत सदस्य शिवाजीराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती रणजितराजे भोसले यांनी दिली. त्यावर चर्चा करण्यात आली, तसेच पुढील काळामध्ये सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार यांना पत्र देऊन त्यांच्याकडून पत्र प्राप्त करून घेण्याचा निर्णय झाला.
यावेळी धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीचे कोअर कमिटी सदस्य संतोष सूर्यवंशी, रईस काझी, प्रभाकर पवार, पी. सी. पाटील, रईस काझी, श्याम भामरे, राजेंद्र खैरनार, संदीप पाकळे, कमर अहमद शेख, रामकृष्ण पाटील, अहाद असमदी, हरीश शेलार, विजय पाटील, गणेश सोनार, महेंद्र शेणगे, चिंतनकुमार ठाकूर, रामचंद्र कोर, तौफिक शेख, हाजी हुसेन, सईद बेग, नरेंद्र अहिरे, राजूभैया रुस्तम, कुणाल वाघ, अजय पाटील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.