मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST2021-08-25T04:40:44+5:302021-08-25T04:40:44+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या धुळे जिल्हा शाखेचा मेळावा वडजाई येथे झाला. त्यावेळी अध्यक्षपदावरून विलास कुमरवार बोलत होते. कार्यक्रमास ...

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या धुळे जिल्हा शाखेचा मेळावा वडजाई येथे झाला. त्यावेळी अध्यक्षपदावरून विलास कुमरवार बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर उपस्थित होते. यावेळी विलास कुमरवार म्हणाले की, शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवीन किमान वेतन लागू केले आहे, परंतु आजपर्यंत कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. तसेच राहणीमान भत्ता व पीएफ ग्रामपंचायत हिस्सा जमा होणे बाकी आहे. तसेच कर्मचाऱ्यांना लावलेल्या जाचक अटी त्वरित रद्द कराव्यात. दहा टक्के आरक्षणानुसार त्यांना लाभ मिळायला हवा. कोरोनासारख्या भयानक महामारीत कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता काम केले आहे. मात्र, त्यांना अवघा दोन ते तीन हजार रुपये पगार दिला जात आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय मिळवून न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत जाधव, उपाध्यक्ष भरत साळुंखे, सचिव जब्बर सिंग राजपूत, तालुका अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, भिकन महाले आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले. संजय पाटील यांनी आभार मानले.