तिखबर्डी गावात पत्नीची विळ्याने हत्या, पती अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:09 IST2020-08-13T12:09:03+5:302020-08-13T12:09:24+5:30

गावात भितीचे वातावरण, मुले आईला मुकली

Wife murdered in Tikhbardi village, husband arrested | तिखबर्डी गावात पत्नीची विळ्याने हत्या, पती अटकेत

तिखबर्डी गावात पत्नीची विळ्याने हत्या, पती अटकेत

बोराडी - शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तिखबर्डी येथे घरगुती वादातून पतीने विळ्याने घाव घालत पत्नीची हत्या केली. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ यात जालुबाई जतनसिंग पावरा (३२) हिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित जतनसिंग रूलजी पावरा याला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे़
पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलांना (सावत्र मुलांना) जीव लावत नाही व संभाळत नाही, याचा राग येवुन शिरपूर तालुक्यातील तिखबर्डी येथील शेतातील घरात संतापलेला संशयित आरोपी जतनसिंग रूलजी पावरा याने तिला शेतातील घरात नेऊन तिच्या मानेच्या मागच्या बाजूला विळ्याने घाव घातला़ यात ती जागेवरच गतप्राण होऊन कोसळली़ या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. वडीलांच्या संतापाने ही मुले आईला पोरकी झाली असून ही घटना घरगुती वादातूनच घडल्याचे सांगण्यात येत आहे़
याप्रकरणी नवलसिंग बंडू पावरा यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एच. सी.मोरे, भूषण चौधरी यांनी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे करीत आहे़

Web Title: Wife murdered in Tikhbardi village, husband arrested

टॅग्स :Dhuleधुळे