भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दूर्लक्ष का करतोआपण देतो १०० रुपये, प्रत्यक्षात पेट्रोल मिळते ५० चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:05+5:302021-03-17T04:37:05+5:30
जिल्ह्यातील पेट्रोल पंप १४२ दरराेज विक्री होणारे डिझेल ५९७० दररोज विक्री होणारे पेट्रोल १०७२५ वर्षभरात ०० तक्रारी १. वैधमापन ...

भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दूर्लक्ष का करतोआपण देतो १०० रुपये, प्रत्यक्षात पेट्रोल मिळते ५० चे
जिल्ह्यातील पेट्रोल पंप १४२
दरराेज विक्री होणारे डिझेल ५९७०
दररोज विक्री होणारे पेट्रोल १०७२५
वर्षभरात ०० तक्रारी
१. वैधमापन विभागाकडे वर्षभरात एकही तक्रार दाखल झालेली नाही. ग्राहक जागरुक नसल्याने लक्षात येते.
२. काही ग्राहक तर केवळ पैसे देऊन मोकळे होतात. रिडींकडे, किंवा किती पेट्रोल टाकले याकडे लक्षही देत नाहीत.
३. सर्वसामान्य नागरिकांची सर्वाधिक फसवणूक पेट्रोल पंपावर होत असल्याचे निदर्शनाला आले आहे. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आले तरी ते सिध्द कसे करावे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
वर्षातून केवळ एक वेळा तपासणी
वैधमापन विभागाकडून पेट्रोल पंपांची वर्षातून केवळ एकच वेळा तपासणी करण्यात येते, अशी माहिती वैधमापन विभागाने दिली. ठरल्याप्रमाणे तपासणी होते. तक्रारी आल्यास तपासणी केली जाते. परंतु तक्रारीच दाखल झालेल्या नाहीत.
पेट्रोल पंपावर डिझेल टाकताना घ्या काळजी
रिडींग झिरो आहे हे आधी पाहावे. तेल टाकत असताना काही हातचलाखी केली जात आहे का ते पाहावे. तेल टाकत असताना लक्ष इतरत्र विचलित होऊ देऊ नये. काही शंका आल्यास प्रत्येक पंपावर पाच लिटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते. त्याद्वारे खात्री करावी.