शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

रावलांविरोधात नेमकं लढणार कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 03:07 IST

दुसरीकडे गेल्या पाच वर्षात रावल यांच्या प्रमुख विरोधकांपैकी डॉ.हेमंत देशमुख हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले.

राजेंद्र शर्माधुळे : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीत कोणाला मिळते, त्यानंतरच राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचे नाव निश्चित होणार आहे. या विधानसभा मतदारसंघाच्या रचनेनंतर सलग दोनदा येथून जयकुमार रावल हे विजयी झाले आहेत. यंदा ते ‘हॅट्ट्रीक’ करण्यासाठी तयारीत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोंडाईचा नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायतीसह कृषी उत्पन्न बाजार समिती व बहुतांश ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्याने निश्चितच भाजपाचे बळ मतदारसंघात वाढले आहे.

दुसरीकडे गेल्या पाच वर्षात रावल यांच्या प्रमुख विरोधकांपैकी डॉ.हेमंत देशमुख हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले. सध्या ते द्वारकाधीश उपसा सिंचन योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोंडाईचा पालिका व शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश प्रमुख नेतेमंडळी भाजपात सामील झाली आहे. मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी कागदावरच एकत्र दिसते, प्रत्यक्षात मात्र निवडणुकीत पक्षातील नेतेमंडळी आतून एकमेकांच्या विरोधात काम करतात, हा इतिहास आहे. त्याचा फायदा नेहमीच प्रतिस्पर्धी पक्षाला मिळाल्याची, खंतही दोन्ही पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करतात. यंदा तरी तसे होऊ नये, अशी अपेक्षा या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे.

शिवसेनेतील इच्छुकांनीही नेहमीप्रमाणे तयारी सुरू केली आहे. परंतु युती झाली तर ही जागा भाजपालाच मिळणार हे स्पष्ट आहे. तसे पाहता काही अपवाद वगळता सेनेचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते हे मंत्री रावल यांच्याच गटाचे असल्याचे सांगितले जाते.पाच वर्षात काय घडले?

  • मतदारसंघातील सर्वात मोठी एकमेव दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे.
  • शिंदखेडा नगरपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नरडाणा ग्रामपंचायतही भाजपाने काबीज केली आहे.
  • तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाºया सुलवाडे - जामफळ योजनेसाठी निधी मंजूर करुन आणला आणि कामाला सुरुवात केली. बुराई नदी बारमाही करण्यासाठी लहान - लहान बंधारे बांधले.
  • मतदारसंघातील दोंडाईचा, शिंदखेडा शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणली. योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे.

विखरण येथील औष्णिक प्रकल्प रद्द केला. त्याऐवजी सोलर प्रकल्प आणण्याचे स्वप्न तरुणांना दाखविले. पण आता तो सोलर प्रकल्पही रद्द करुन असंख्य सुशिक्षित बेरोजगार युवकांचा विश्वासघात करण्याचे काम केले आहे. - शामकांत सनेर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, धुळे 

निवडणूक 2014 

जयकुमार रावल (भाजप)९२,७९४ मतेसंदीप बेडसे (राष्ट्रवादी)५०,६३६ मतेशामकांत सनेर (काँग्रेस)४८,०२५ मते

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावलsindkheda-acसिंधखेडाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019