रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीचीदोन्ही परीक्षा एकाच दिवशी; विद्यार`थी एका परीक्षेला मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:07+5:302021-03-17T04:37:07+5:30
रेल्वेची परीक्षा होणार आॅनलाईन रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा होणार आहेत. देशभरातील १९ लाख विद्यार`थी ही ...

रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीचीदोन्ही परीक्षा एकाच दिवशी; विद्यार`थी एका परीक्षेला मुकणार
रेल्वेची परीक्षा होणार आॅनलाईन
रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा होणार आहेत. देशभरातील १९ लाख विद्यार`थी ही परीक्षा देत आहेत. जिल्ह्यातील विद्यार`थींची संख्या १५०० पेक्षा अधिक आहे. ही परीक्षा आॅनलाईन होणार आहे.
केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार`थींची कसरत
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार`थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. लाॅकडाऊन असलेल्या शहरांमध्ये राहण्याची सोय होणार नसल्याने विद्यार`थींची परवड होणार आहे.
दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार`थी म्हणतात
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने केवळ एकच परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे मी एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. एका परीक्षेसाठी केलेला खर्च वाया जाणार आहे. - चेतन माळी, सोनगीर
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने आता कोणती परीक्षा द्यावी हे सुचत नाही. परंतु एमपीएससीची परीक्षा धुळ्यातच होणार असल्याने प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे आहे. एमपीएससीची परीक्षा देणार आहे. - ज्योतिलाल राठोड, मोरदड तांडा
दोन्ही परीक्षांचा चांगला अभ्यास झाला होता. परंतु एकाच दिवशी परीक्षा असल्याने पेच निर्माण झाला आहे. नेमकी कोणती परीक्षा द्यावी हा विचार अजुन केलेला नाही. एका अर्जाचा खर्च वाया जाणार आहे. - आकाश चव्हाण, सिताणे
एमपीएससीसाठी विद्यार`थी ९०२
परीक्षा केंद्रे ०४