रस्त्यांची दुरुस्ती होणार की नाही....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:58+5:302021-09-15T04:41:58+5:30
देवपुरातील बहुतांश ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. परिणामी रस्ते मधोमध खोदल्यामुळे पुरती वाट लागली आहे. काम पूर्ण होणार, ...

रस्त्यांची दुरुस्ती होणार की नाही....
देवपुरातील बहुतांश ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. परिणामी रस्ते मधोमध खोदल्यामुळे पुरती वाट लागली आहे. काम पूर्ण होणार, त्याची दुरुस्ती होणार असे सांगण्यात येत असले तरी आजच्या स्थितीत त्याची दुरवस्था हा चिंतेचा विषय आहे. विकास हा कोणाला नको आहे, पण तो साधत असताना मात्र वेळ आणि काळाचे ही बंधन असायला हवे. हेच नसल्याची वस्तुस्थिती देवपुरात सुरू असलेल्या कामांवरून प्रकर्षाने समोर आली आहे. काम सुरू असलेतरी त्याची गती मात्र आले नसल्याचे सत्य देखील नाकारुन चालणार नाही. ज्या भागात काम सुरू आहे, तेथील रस्त्याची दुरवस्था पाहून नागरिक देखील आता चिंता व्यक्त करू लागले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी तर पायी चालणे देखील दुरापास्त झाले आहे. असे असेल तर देवपुरातील वर्दळीचे रस्ते, कॉलनीतील रस्त्याकडे लक्ष देणार कोण, कधी होणार रस्त्यांची दुरुस्ती, यांना जाब विचारणार कोण असे प्रश्न निर्माण होत असून ते सुटलेले नाही. गणपतीचा काळ सुरु असूनही देखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
- देवेंद्र पाठक