प्रतिमा उंचावरणारे सुसंस्कृत आणि सुरक्षित धुळे होईल तरी केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:28 IST2020-11-13T22:27:58+5:302020-11-13T22:28:50+5:30
शहर संवेदनशील असतांनाही सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याकडे दुर्लक्ष

dhule
धुळे : महानगरातील कायदा व सुवव्यवस्स्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मनपा निवडणूकीत संपुर्ण शहरात सीसीटीव्व्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षात शहरातील वर्दळीच्या काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे.
२०१९ ते सप्टेबर २०२० पर्यत शहराच्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यात २०१९ मध्ये २४ खून, ४१ खुनाचा प्रयत्न, ५१७ चोरी, २४ दरोडे, १३१५ मारहाण, ३७ बलात्कार व ११० विनयंभगच्या घटना तसेच २०२० मध्ये ३५१ चोरी १४ दरोडे, ३२ बलात्कार ३१ खुनाचा प्रयत्न झाल्याची नोंद पाेलिस डायरीत आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ष्टीने संपुर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत गरज आहे. असे असतांना केवळ व्यापारी व काही वर्दळ असलेल्या चाैकात सीसीटी्व्ही बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे गुन्हे घडल्यावर पोलिसांना गुन्हेगारीविषयी काहीही धागेदारे हाती मिळत नसल्याने अनेक महिन्यापर्यत गुन्हाचा तपास सुरू असतो. तर सीसीटीव्हीच्या मागणीकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनाकडून केला जात आहे.