व्हीलचेअर नावालाच, दिव्यांगासह ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:01 IST2021-01-28T15:58:42+5:302021-01-28T16:01:14+5:30
धुळे : बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रणात कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व जेष्ठ ...

व्हीलचेअर नावालाच, दिव्यांगासह ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत
धुळे : बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रणात कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना माहितीच नसल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळले.
बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. ६००पेक्षा अधिक बसेस बसस्थानकावर ये - जा करतात. धुळे शहरातून महत्त्वाचे दोन महामार्ग जातात. तसेच दोन राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागलेल्या आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्त्वाचे स्थान आहे. येथील बसस्थानकातून इतर राज्यात जाणाऱ्या बसेसची संख्याही मोठी आहे. तसेच येथून इतर शहरात दररोज ये - जा करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. त्याचा दिव्यांग बांधवांना उपयोग होत आहे. तसेच रोटरी क्लबकडून व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्थानकातील नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांनी मागणी केली तर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येते.
व्हीलचेअर नियंत्रण कक्षात
बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध आहे. दिव्यांग प्रवाशांना त्याबाबत माहिती नाही. नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. व्हीलचेअर असूनही दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे.