मातृवंदना योजना काय असते ताई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:32 AM2021-03-07T04:32:51+5:302021-03-07T04:32:51+5:30

या योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारच्या ४० टक्के सहभाग असतो. मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश प्रसूतीच्या अगोदर ...

What is Matruvandana Yojana? | मातृवंदना योजना काय असते ताई?

मातृवंदना योजना काय असते ताई?

Next

या योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारच्या ४० टक्के सहभाग असतो. मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश प्रसूतीच्या अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हावा, हा आहे. आर्थिक मोबदला दिल्यामुळे गरोदर व स्तनदा माताच्या आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकडे कल वाढलेला आहे. महानगरात मातृवंदना योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गर्भावस्थेत महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून मातृवंदना योजनेचा लाभ म्हणून पाच हजार रुपये दिले जातात. तसेच या योजनेमुळे बाळंतपणातील मृत्युदर कमी झालेले आहे. गरोदर काळात महिलांना या योजनेचा मोठा दिलासा मिळत असल्याने कुपोषणाचे शंभर टक्के प्रमाण नियंत्रणात आहे.

तीन टप्प्यांत पाच हजार

रुपयांचे अनुदान

योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला, तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. गर्भवतींना पाच हजार रुपये पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत देण्यात येतात. हे पाच हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसात गरोदर महिलेची ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये देण्यात येतात. दुसऱ्या टप्प्यात प्रसवपूर्व तपासणी केल्यावर गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये गर्भवतींना दिले जातात.

लाभासाठी साधा संपर्क

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.

Web Title: What is Matruvandana Yojana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.