सेवानिवृत्त जवानाचे गावात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:37+5:302021-07-20T04:24:37+5:30
वसमार येथील ग्रामदैवत भवानी मातेचे दर्शन घेऊन चारचाकी गाडीत सैनिक राकेश नेरे व त्यांच्या पत्नी सुनीता नेरे, मुलगा मुलगी ...

सेवानिवृत्त जवानाचे गावात स्वागत
वसमार येथील ग्रामदैवत भवानी मातेचे दर्शन घेऊन चारचाकी गाडीत सैनिक राकेश नेरे व त्यांच्या पत्नी सुनीता नेरे, मुलगा मुलगी व त्यांच्या आईवडील माधवराव नेरे, वेणूबाई नेरे हे सोबत होते. राकेश नेरे याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी सैनिकांचे औक्षणही केले. यावेळी माजी सैनिक अध्यक्ष कॅप्टन सीताराम नेरे, प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर सीताराम जाधव, जयवंत नेरे, दिलीप खरे, सुनील दीक्षित, योगेश महाले, गायकवाड, दिनेश नेरे, सतीश नेरे होते.
वसमारचे सरपंच उपसरपंच सदस्य, तसेच म्हसदी येथील उपसरपंच चंद्रकांत देवरे, कुंदन देवरे, वसमार येथील माजी सरपंच भरत नेरे, माध्यमिक विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सैनिक राकेश नेरे यांचा सत्कार केला. मंगेश नेरे, संदीप नेरे, चंद्रकांत देवरे, पी.बी. नेरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक योगेश हिरे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.