देगाव येथे पालखीने वरुणराजाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:17 IST2019-07-21T23:17:10+5:302019-07-21T23:17:33+5:30

परिसरात चैतन्य : बहुप्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन

Welcome to Varunraj with palanquin at Gavve | देगाव येथे पालखीने वरुणराजाचे स्वागत

देगाव येथे गावातून पालखी काढून वरुणराजाचे स्वागत करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : प्रदीर्घ कालावधीनंतर पावसाचे आगमन झाल्याने देगाव ग्रामस्थांनी रविवारी गावातून पालखी काढून वरुणराजाचे स्वागत केले. यावेळी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.
अनेक दिवसांपासून पाऊस लांबला होता. पाऊस पडावा म्हणून ग्रामस्थांनी श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सुरू केले होते. दरम्यान, पाऊस झाल्याने रविवारी देगाव  येथील ग्रामस्थांनी वाजत गाजत पालखी काढली व श्रीराम मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामधून मंडळ व मोहनसिंग  गिरासे, साहेबराव गिरासे, हंबर गिरासे, लोटनसिंग गिरासे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Welcome to Varunraj with palanquin at Gavve

टॅग्स :Dhuleधुळे