शिवज्योत मशाल यात्रेचे सोनगीरला स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:41+5:302021-08-26T04:38:41+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. तिथून सुटका करून घेण्याच्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाली. त्या ...

शिवज्योत मशाल यात्रेचे सोनगीरला स्वागत
छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. तिथून सुटका करून घेण्याच्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गरूडझेप मोहिमेंतर्गत आग्रा ते राजगड अशी १,२०० किमीची यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचे येथील वाघाडी फाट्यावर शिवप्रेमींतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. यात्रेसोबत असलेल्या मशालीचे पूजन करण्यात आले.
यावेळी मशालीचे पूजन व ॲड.मारोतीआबा गोळे व सहकार्याचे स्वागत सरपंच रुख्माताई ठाकरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभागाध्यक्ष डॉ.अजय सोनवणे, माजी जि.प. सदस्य श्यामलाल मोरे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आर.के. माळी, जि.प. सदस्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, उपसरपंच प्रतिनिधी रवींद्र बडगुजर, भाजप शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा.डाॅ.आर.जी. खैरनार, सामाजिक कार्यकर्ते सुनील भदाणे, अभियंता गोरख पाटील, मोहन सैदाणे, डाॅ.मनोज पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, मुख्याध्यापक कैलास पाटील, बाभळेचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील, सोनगीर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम.टी. गुजर, एल.बी. चौधरी, प्रमोद धनगर, शिवभक्त अनिल पवार, किशोर सोमवंशी, संजीव पाटील, अर्जुन शेळके, मोहन देवरे, भैरूलाल पाटील, जयेश पाटील, नरेंद्र पवार, कपिल पाटील, गंभा कल्पना भदाणे, ज्योत्स्ना सोमवंशी, खुशी सोमवंशी आदी उपस्थित होते.