व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, मार्गदर्शनासाठी आज वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:19+5:302021-07-29T04:35:19+5:30
धुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे ...

व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, मार्गदर्शनासाठी आज वेबिनार
धुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे कार्यरत आहे. तेथे मागासवर्गीय (बारावी विज्ञान शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रमातील) विद्यार्थी, मागास प्रवर्गातून नियुक्त अधिकारी, कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणुकींकरिता इच्छुक उमेदवार आदींना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करून अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून शासनाने ऑनलाईन सुविधा ऑगस्ट २०२० पासून सुरू केली आहे. मात्र, अर्ज करताना उमेदवारांना अनेकदा अडचणी निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १ वाजता झूम ऑनलाईन मिटिंग ॲप्लिकेशनद्वारे लिंकवर मोफत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या मिटिंगचा आयडी असा : ३०४ २५४ १९०५ असा आहे, तर पासवर्ड Tm6DjU असा आहे. या मार्गदर्शन वर्गात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवार, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.