आयुष्य सुखी बनविण्याचे मर्म जाणून घेणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST2021-06-17T04:25:05+5:302021-06-17T04:25:05+5:30
विद्या विकास मंडळाचे सि.गो. पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे आयोजित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘लव ...

आयुष्य सुखी बनविण्याचे मर्म जाणून घेणे गरजेचे
विद्या विकास मंडळाचे सि.गो. पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे आयोजित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘लव यू जिंदगी’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रमुख वक्त्या औरंगाबादच्या नंदिनी भावसार होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे होते. कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.एल तोरवणे, प्राध्यापक संघटनेचे डॉ.संजय सोनवणे, प्राचार्य डॉ.एस.टी.सोनवणे, प्राचार्य डॉ.मनोहर पाटील,प्राचार्य डॉ.के.बी. पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, डॉ.सचिन नांद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्र.कुलगुरू डॉ.बी.व्ही पवार पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या या काळात सर्वांनी मानसिकदृष्ट्या सशक्त व सुदृढ राहणे गरजेचे आहे, ज्यातून या आजाराशी लढण्यासाठी बळ प्राप्त होईल. एखादी संधी प्राप्त झाली नाही, म्हणून दुःखी न होता, अधिकाधिक प्रयत्न करून नवनवीन संधींचे सोने प्रत्येक व्यक्तीने करावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
नंदिनी भावसार यांनी सुख आणि आनंद हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार असून, तो प्राप्त व्हायलाच पाहिजे. भविष्यकाळाचा वेध घेत बसण्यापेक्षा अथवा भूतकाळाचा मागोवा घेण्यापेक्षा वर्तमान काळात जगणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यानी नमूद केले.
डॉ.राजेंद्र अहिरे यांनी कोरोना महामारीसारख्या संक्रमण काळातून जात असताना, जीवनात आलेली मरगळ नष्ट करून, आशादायी आयुष्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादित केले. विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगला सुरेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी संतोष भावसार, तसेच डॉ.हसीन तडवी,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.लहू पवार व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.