धुळे जिल्ह्यातील गावांना पाणी द्या, अन्यथा अधिकाºयांना काळे फासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:14 IST2018-10-26T18:12:43+5:302018-10-26T18:14:46+5:30

धुळे तालुका : टंचाई आढावा बैठकीत माजी सरपंचांनी दिला इशारा

Water the villages in Dhule district, otherwise the officials will get black fasas | धुळे जिल्ह्यातील गावांना पाणी द्या, अन्यथा अधिकाºयांना काळे फासू

धुळे जिल्ह्यातील गावांना पाणी द्या, अन्यथा अधिकाºयांना काळे फासू

ठळक मुद्देआमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठकटंचाई दूर करण्याची एकमुखी मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गावाला पाणी द्या, अन्यथा पाटबंधारे अधिकाºयांना काळे फासू, असा   इशारा धुळे तालुक्यातील सावळदे येथील माजी सरपंच यांनी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित तालुका आढावा बैठकीत दिला. तसेच एका पदाधिकाºयांनी आमदाराच्या गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असेल तर इतर गावांचा पाणी प्रश्न कसा सुटणार असा प्रश्न उपस्थित केला होता़
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डी़ गंगाथरण, तहसीलदार अमोल मोरे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण व आरोग्य सभापती नूतन पाटील, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आदी उपस्थित होते़ 
  सावळदे रानमळा परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी व पिण्यासाठी धरणातून पाणीपुरवठा केला जातो़  शेतकºयांना दहा किलो मिटरपर्यतची पाईप लाईन टाकून पीक वाचविण्यासाठी शेतापर्यत पाणी आणावे लागत आहे़ मात्र यासाठी शेतकºयांना  दहा हजार रूपये पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना द्यावे लागते़ तरच शेतापर्यत पाणी पोहचते़ पाण्याअभावी शेतकरी मरण्याची वेळ आली आहे़ गावाला पाणी द्या अन्यथा शेतकरी  पाटबंधारे अधिकाºयांना काळे फासणार असा इशारा सावळदे येथील पदाधिकारी शेतकºयाने दिला़ 
तालुक्यातील निमगुळ गावाजवळील  धरणातून होणाºया वाळू उपसाप्रकरणी किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची विचारणा केल्यावर तहसीलदार व पदाधिकाºयांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती़ 

Web Title: Water the villages in Dhule district, otherwise the officials will get black fasas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.