पाणीपुरवठा योजनेचे 'ग्रहण' कायम
By Admin | Updated: April 15, 2015 15:39 IST2015-04-15T15:38:51+5:302015-04-15T15:39:13+5:30
शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम भाजपने रविवारी पुन्हा बंद पाडले.

पाणीपुरवठा योजनेचे 'ग्रहण' कायम
धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम भाजपने रविवारी पुन्हा बंद पाडले. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे दिसून येत असल्याचे भाजपने यापूर्वीकेलेल्या आंदोलनातून समोर आणल्यानंतरही कामात सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. भाजपच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रभारी आयुक्त धनाड यांनी थांबविले होते. परंतु तरी काम सुरूच असून तेदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्याने योजनेचे 'ग्रहण' कायम आहे.