पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:08+5:302021-05-12T04:37:08+5:30

आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढतोय धुळे : जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊलोड केले असून, ...

The water supply schedule collapsed | पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढतोय

धुळे : जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊलोड केले असून, त्याचा वापरदेखील करीत आहेत. कोणत्या परिसरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे याची माहिती मिळत असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास मदत झाली, तसेच प्रशासनासह आरोग्य विभागालादेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोपे गेले, अशी माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने आणि या ॲपवर लसीकरणाचे अपडेट देखील मिळत असल्याने आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढला आहे.

मैंदाणे शिवारात धरणाचे काम प्रगतीत

पिंपळनेर : मैंदाणे (ता. साक्री) शिवारातील धरणाचे पुनर्रचना मातीकाम करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेकडून धरणाच्या खोली, उंची व रुंदीसाठी २३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे धरण मैंदाणे शिवारातील शेतकऱ्यांना शेती, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करणार आहे. यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या कामाचे साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी डिसेंबर महिन्यात भूमिपूजन केले होते. धरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

नकाने रोड-वलवाडी रस्त्याची दुरवस्था

धुळे : येथील देवपुरातील नकाणे रोड ते वलवाडी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हा डीपी रस्ता अनेक वर्षांपूर्वी बनविला होता. गेल्या वर्षी निम्म्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु आधार नगरपासून ते नकाणे रस्त्याचे काम मात्र रखडले आहे. देवपुरातील अनेक वसाहती या रस्त्याला जोडल्या आहेत. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: The water supply schedule collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.