दामसेरपाडा येथील ‘शिरपूर पॅटर्न’ बंधाऱ्यात पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:56 IST2020-08-02T12:56:21+5:302020-08-02T12:56:49+5:30
संडे अँकर । उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याहस्ते जलपूजन

दामसेरपाडा येथील ‘शिरपूर पॅटर्न’ बंधाऱ्यात पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील थाळनेर येथील दामसेरपाडा येथे शिरपूर पॅटर्न बंधाºयात मोठया प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.
थाळनेर दामसेरपाडा येथील शिरपूर पॅटर्न बंधारामध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन जलपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाठ, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, सरपंच प्रशांत पाटील, प्रेमचंद शिरसाठ, धनराज मराठे, उज्वल पाटील, सर्जेराव पाटील, भरत मराठे, दिलीप कोळी, शांताराम कोळी, रवींद्र मराठे, सुनील पाटील, रामकृष्ण पाटील, विलास पाटील, सुधाकर पाटील, अभिमन ठाकरे, महेश पाटील, संभाजी पाटील, नवल पाटील, अनिल मराठे, सुभाष शिरसाठ, नारायण पाटील, राकेश बाविस्कर, पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, स्वीय सहाय्यक सुनील जैन, भालेराव माळी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. मुबलक जलसाठा पाहून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला़
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात शिरपूर पॅटर्न अंतर्गत २४० पेक्षा जास्त बंधारे बांधून पूर्ण झाले असून सर्व बंधाºयांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने त्या-त्या भागातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
३०० नवीन बंधाºयांचे नियोजन
यापुढे देखील ३०० पेक्षा जास्त नवीन शिरपूर पॅटर्न बंधारे बांधण्याच्यादृष्टीने माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे प्रयत्न सुरू आहेत.