करवंद धरणाचे पाणी खरीप पिकांसाठी सोडण्यात आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST2021-09-04T04:42:46+5:302021-09-04T04:42:46+5:30
गेल्या वर्षी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने करवंद धरणाच्या परिसरात गाळ ...

करवंद धरणाचे पाणी खरीप पिकांसाठी सोडण्यात आले
गेल्या वर्षी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने करवंद धरणाच्या परिसरात गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला होता. हा गाळ असंख्य शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात आपल्या ट्रॅक्टर वाहनांनी वाहून नेल्याने जमिनी सुपीक होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली. गाळ काढल्यामुळे करवंद धरण व परिसरात भूजल पातळी वाढण्यास देखील मोठी मदत झाली.
नदी पात्रात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होते व गाळ साचतच राहतो. त्या कारणामुळे सिंचनही कमी होते. म्हणून गाळ वाहून जाण्यासाठी व जलपुनर्भरण होण्यासाठी करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी शेतकºयांच्या फायद्यासाठी वापर पिकांसाठी सोडण्यात आले. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने तसेच माजी उपाध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र जयराम पाटील, पाटबंधारे इंजिनियर सी.पी.धाकड, आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, प्रेमसिंग राऊळ, धनराज पाटील, माधवसिंग राऊळ, रमेश पाटील, विपुल माहेश्वरी, विनोद पाटील व पाटबंधारे कर्मचारी यांच्या उपस्थितीत नदीपात्रातील गाळ वाहून जाण्यासाठी व अर्थे, भरवाडे, विखरण एस्केप हे पुनर्भरणासाठी अमरिशभाई पटेल यांनी निर्माण केलेल्या शिरपूर पॅटर्नच्या बंधाºयात पाणी सोडण्यात आले. यामुळे बंधाºयात गुरुत्वाकर्षणामुुुळे नैसर्गिकरित्या पुनर्भरण होऊन जमिनीची पाण्याची पातळी वाढून दुहेरी उद्देश साध्य होतात. यामुळे मागील वर्षी शेतकºयांचे पुनर्भरणमुळे पाण्याची पातळी वाढून बागायती क्षेत्र वाढले आहे.