वडजाई अमरधाममध्ये पाण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:29+5:302021-04-24T04:36:29+5:30

वडजाई येथील अमरधाममध्ये पूर्वी कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यामुळे प्रचंड गैरसोय नातेवाइकांची होत होती. बाहेरगावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाइकांना अंत्यविधीचा ...

Water facility at Wadjai Amardham | वडजाई अमरधाममध्ये पाण्याची सुविधा

वडजाई अमरधाममध्ये पाण्याची सुविधा

वडजाई येथील अमरधाममध्ये पूर्वी कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यामुळे प्रचंड गैरसोय नातेवाइकांची होत होती. बाहेरगावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाइकांना अंत्यविधीचा सोपस्कार आटोपल्यानंतर गावातील एखाद्या व्यक्तीच्या घरी हातपाय धुण्यासाठी जावे लागत होते, तर मृतदेहाला शेवटच्या क्षणी पाणी देण्यासाठी गावातून पाण्याची बादली भरून आणावे लागत होती, अशी अवस्था अमरधामची होती. अमरधाममध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती व गावाचे रहिवासी असणारे; परंतु व्यवसायानिमित्ताने धुळे येथे वास्तव्यास असणारे डॉ. प्रशांत नारायण देवरे यांनी आपल्या वडिलांच्या नारायण देवरे याच्या पुण्यस्मरणार्थ अमरधाममध्ये स्वखर्चाने बोअरवेल करून दिला. लाइट फिटिंगची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे भिलाली येथील अनिल साळुंके परिवार गेल्या अनेक वर्षांपासून वडजाई येथे राहतात. त्यांनी मातोश्री वैजंताबाई साळुंके यांच्या पुण्यस्मरणार्थ अमरधाममध्ये नळ फिटिंग पाण्याची टाकी बसून हातपाय धुण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नातेवाइकांना अमरधाममध्ये हातपाय धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर प्रशांत देवरे व अनिल साळुंखे या परिवाराचे गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Web Title: Water facility at Wadjai Amardham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.