नियोजनाअभावी आठ-दहा दिवसांआडच मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:29 AM2019-11-18T11:29:38+5:302019-11-18T11:30:16+5:30

महापालिका : बहुतांश भागात टंचाई; लोकप्रतिनिधींनाही प्रशासनाचा ठेंगा

Water is available for eight to ten days before planning | नियोजनाअभावी आठ-दहा दिवसांआडच मिळते पाणी

dhule

Next

धुळे : जिल्ह्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे़ त्यामुळे पांझरा नदीत पाण्याचा विर्सग देखील सोडण्यात आला होता़ पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतांना देखील केवळ नियोजना अभावी नागरिकांना पिण्यासाठी कासावीस करावी लागत आहे़
यंदा पाच महिने पावसाने हजेरी लावली होती़ जिल्ह्यातील लाटीपाठा, मालनगाव, जामखेली, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अमरावती, अनेर सोनवद, कनोली असे १२ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत़ शहराला पाणी पुरवठा करणारे अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने नकाणे, डेडरगाव तलावात आर्वतन सोडण्यात आले आहे़ त्यामुळे दोन्ही तलाव शंभर टक्के भरले आहे़ तर तापीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकणारा आहे़ मात्र असे असतांना देखील शहरातील बहूसंख्य भागात नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़
मनपाच्या विहरी देखील भरल्या
शहरात मनपा मालकीच्या अहिल्यादेवी नगर, अण्णासाहेब पाटील नगर, सोन्या मारूती कॉलनी, सिध्दार्थ नगर, नवजीवन नगर, शनि नगर व जमनागिरी भिलाटी याठिकाणी विहीरी आहेत़ यंदा पुरसा पाऊस झाल्याने या विहरी भरल्या आहेत़ मात्र बहूसंख्या विहरीचे हातपंप नादुरूस्त, तर पंप चोरीला गेले आहे़ त्यामुळे बऱ्याच वर्षापासून विहरीतील पाण्याचा उपसा झालेला नसल्याने काही विहरीचे पाणी पिण्या योग्य नाही़ त्यामुळे विहरीत पाणी उपलब्ध असतांनाही नागरिकांना पाण्यासाठी ८ ते १० दिवस वाट पहावी लागते़
पाणीप्रश्न सुटू शकतो
मनपा मालकीच्या बहूसंख्य प्रभागामध्ये विहरी पडून आहे़ मात्र पाण्याचा उपसा व विहीरीतील गाळ व पंप बसवून परिसरातील नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़़ त्यामुळे पाण्याचा उपसा झाल्याने विहरी जिवंत होऊ शकतात व पाणीप्रश्न सोडविण्यात देखील मदत होऊ शकते़
याठिकाणी टंचाई
नकाणे तलावावरून कुमार नगर, सिमेंट जलकुंभ, अशोक नगर व राम नगर असे चार जलकुंभ भरले जातात़ त्यावरून ांपूर्ण मोगलाई भाग, पेठ भाग, ८० फुटी रोड, ४० गाव रोड, राजकमल टॉकीजच्या मागील परिसर, जुने धुळे परिसरातील निम्मा परिसर, अशोक नगर, चितोड रोड आणि राम नगर पाणीपुरवठा होतो़

Web Title: Water is available for eight to ten days before planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे