वार वि.का. सोसायटीची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:33 IST2020-02-17T17:33:14+5:302020-02-17T17:33:57+5:30
बिनविरोध : चेअरमनपदी दिलीप पाटील यांची निवड

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसुंबा : धुळे तालुक्यातील वार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी दिलीप काशिनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली वार वि.का. सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पडली. गेल्या २५ वर्षांपासून डॉ.दरबारसिंग गिरासे हे सोसायटी चेअरमन होते. त्यांनी नुकताच आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात दिलीप काशिनाथ पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या सभेला संचालक यशवंत पाटील, दिपकसिंग पाटील, युवराज मराठे, सरदारसिंग गिरासे, सुरेश ठाकरे, आनंदा माळी, अनिल भिल, गुलाबसिंग गिरासे, पितांबर माळी, लताबाई जिरे, प्रमिलाबाई पाटील आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी विजयराव भडागे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव दिनेश भामरे यांचे सहकार्य मिळाले. निवडीनंतर दिलीप पाटील यांचा डॉ.गिरासे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.