Warning to strike Satyagraha agitation with fasting to save constitution | संविधान वाचविण्यासाठी उपोषणासह सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा

संविधान वाचविण्यासाठी उपोषणासह सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा

धुळे : सीएए कायद्याची आवश्यकता नसताना तो लादण्याचा घाट घातला जात आहे़ त्याच्या विरोधात आणि संविधान वाचविण्यासाठी उपोषण आणि सत्याग्रही आंदोलन छेडण्याचा इशारा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला़
ते म्हणाले, देशात सर्वत्र भाईचाऱ्याची गरज आहे़ नागरीकत्वाचा मुद्दा पुढे रेटत असताना विदेशी भांडवलाची घुसखोरी होत आहे ती थांबविण्याऐवजी सीएए कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु आहेत़ आमचा कायद्याला नाहीतर धोरणाला विरोध आहे़ नागरीकांची कर्तव्य काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे़ आंदोलनाचे विविध टप्पे होत असताना ३० जानेवारी रोजी मानवी श्रृंखला तयार केली जाणार आहे़ १ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील बडवानी येथे एक श्याम नर्मदा के नाम हा कार्यक्रम होणार आहे़ २२ फेब्रुवारी रोजी शहिदांच्या स्मरणार्थ एक दिवसाचे उपोषण केले जाईल़ २३ मार्च पासून सत्याग्रह आंदोलन छेडले जाणार असल्याचेही मेधा पाटकर यांनी सांगितले़

Web Title: Warning to strike Satyagraha agitation with fasting to save constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.