The warmth of Maya for 2 families | ३० कुटुंबांना मायेची उब
३० कुटुंबांना मायेची उब

शिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे परिसरात ऊसतोड करणाºया ३० मजूर कुटुंबांना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले़ सामाजिक जाणिव ठेवून स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे कौतुक केले जात आहे़
शाळेत ‘साद माणुसकीची’ या उपक्रमांतर्गत शालेय परिसराच्या शेजारी परप्रांतातून  ऊसतोडसाठी आलेले कामगार झोपडीत वस्ती करुन राहत आहे.  या कुटुंबातील चिमकुल्यांचा उघड्यावरच निवारा आहे़ या चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़
 वरूळ शाळेतील प्राचार्य पी.आर.साळुंखे यांनी या उपक्रमाची संकल्पना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पुढे मांडली अन् या संकल्पनेस उत्स्फुर्त प्रतिसाद देत राष्ट्रीय सेवा योजना व शाळेतील मुलींनी हातभार लावण्याची ग्वाही दिली़
गोरगरिबांचे थंडीपासून रक्षण व्हावे या उद्देशाने ‘साद माणुसकीची’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात  ३० ऊसतोड कामगार स्त्री-पुरुष, लहान मुले-मुली यांना शर्ट, पॅन्ट, साडी, पंजाबी ड्रेस, स्वेटर, पादत्राणे तसेच जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले़ कामगारांच्या कुटुंबियांना संसारोपयोगी वस्तु मिळाल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य पाहून शाळेतील शिक्षकांना गहिवरून आले़ यावेळी प्राचार्य पी.आर.साळुंखे, एम.आर.पाटकर, आर.ए.माळी, डी.ए. जाधव, राकेश रघुवंशी, एस.जे. पाटील, एस.के. पाटील, एम.एस. पाटील, बी.जी. पिंजारी, एन.एस. ढिवरे, ए.बी. महाजन, डी.एन.माळी, बी.एस. बडगुजर, पी.टी.पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते़ 
सुत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी आर.आर.रघुवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोच्या मुलींनी सहकार्य          केले़ 

Web Title: The warmth of Maya for 2 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.