हिरेतील बालरोग विभागाच्या भिंती चित्रांनी सजल्या, धुळे एज्युकेशन सोसायटीचा सामाजिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST2021-09-14T04:42:24+5:302021-09-14T04:42:24+5:30
एरव्ही रुग्णालयातील वातावरण कधीच आनंददायी नसते. रुग्णालय म्हटले काळजीत असलेले रुग्ण व नातेवाईक दिसतात. मात्र बालरोग विभागाच्या भिंती विविध ...

हिरेतील बालरोग विभागाच्या भिंती चित्रांनी सजल्या, धुळे एज्युकेशन सोसायटीचा सामाजिक उपक्रम
एरव्ही रुग्णालयातील वातावरण कधीच आनंददायी नसते. रुग्णालय म्हटले काळजीत असलेले रुग्ण व नातेवाईक दिसतात. मात्र बालरोग विभागाच्या भिंती विविध चित्रे व कार्टून रंगल्यामुळे बालरुग्णांना काहीसा दिलासा मिळाला असून, मोठ्या व्यक्तींना त्या चित्रांमधून माहिती मिळत आहे तर बालरुग्णांचे मनोरंजन होत आहे. बोलक्या भिंती करण्यासाठी धुळे एज्युकेशन सोसायटीने सजावट साहित्य उपलब्ध करून दिले होते. सदर भित्तीचित्र असलेल्या दालनांचे उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष रवी बेलपाठक यांच्या हस्ते झाले, तर माताकक्षाचे उद्घाटन संस्थचे उपाध्यक्ष डॉ. महेश घुगरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेलपाठक यांनी बोलताना सांगितले की, सामाजिक जाणीव ठेवून संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेली रुग्णसेवा अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महाविद्यालयाचे उपाधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, बालरोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नीता हटकर, डॉ. अनिता रानडे, डॉ. ज्योतीकुमार बागुल, अनारसिंग पावरा, मुख्याध्यापक एन. एम. जोशी, किरण माडे, श्रीराम चित्रे, गुलाब ठाकरे, डी. एम. बागुल, हर्षल पुराणिक, जे. व्ही. जोशी, सीमा जोशी, स्वाती पाठक आदी उपस्थित होते.