बेडवरून उठताही न येणाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:53+5:302021-07-26T04:32:53+5:30
धुळे - बेडवरून उठताही न येऊ शकणाऱ्या नागरिकांना लसीकरणाची अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. जे नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण ...

बेडवरून उठताही न येणाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा
धुळे - बेडवरून उठताही न येऊ शकणाऱ्या नागरिकांना लसीकरणाची अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. जे नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी राज्यातील काही शहरांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील वृद्ध नागरिकांना त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई व पुणे या शहरातील काही भागांमध्ये लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना घरी जाऊन लस दिली जात आहे. तर इतर काही जिल्ह्यांमध्ये किती वृद्ध नागरिकांना घरी जाऊन लस देणे आवश्यक आहे त्याबाबत माहिती संकलनास सुरुवात झाली आहे. मात्र धुळ्यात लसीकरणाची गती अजूनही धिमी आहे. लसीकरणाची लक्ष्यपूर्ती झालेली नाही त्यामुळे घरी जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन केलेले नाही.
हायरिस्कमध्ये कोण ?
जेष्ठ नागरिक कोरोनाच्या हायरिस्कमध्ये येतात. वय अधिक असलेले तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आदी व्याधी असलेल्या नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असतो. त्यामुळे या नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करणे गरजेचे आहे. मात्र लसीकरण केंद्रावर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने अणे नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही.
घरी जाऊन लस देण्याबाबत सूचना नाहीत
घरी जाऊन लस देण्याबाबत नियोजन झालेले नाही. त्याबाबत शासनाच्या कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर आहे. पुरेसे डोस मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस - ४३५०८०
दुसरा डोस - १२५७७६
४५ पेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस - २५०४१५
दुसरा डोस - ९४५८५