भरड धान्य खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:17+5:302021-05-11T04:38:17+5:30

शासनाकडून दरवर्षी मका, हरभरा, ज्वारी हे भरडधान्य शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केले जाते़. त्यासाठी नोंदणी आवश्यक असते़. येथील केंद्र ...

Waiting for farmers to buy coarse grains | भरड धान्य खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

भरड धान्य खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Next

शासनाकडून दरवर्षी मका, हरभरा, ज्वारी हे भरडधान्य शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केले जाते़. त्यासाठी नोंदणी आवश्यक असते़. येथील केंद्र शेतकरी सहकारी संघाकडे हे खरेदी केंद्र असून ३० एप्रिलपर्यंत भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़. त्यांच्याच शेतमालाची खरेदी केली जाणार आहे़ ६८० शेतकऱ्यांनी या केंद्रांवर नोंदणी केली आहे़ त्यात २९४ शेतकऱ्यांनी मकाची नोंदणी केली आहे़ ३७४ शेतकरी ज्वारीचे तर १२ लोकांनी गव्हाची नोंदणी केली आहे़ मकाला १८५०, ज्वारी २६२० तर गव्हाला १९७५ रुपये प्रतिक्विंटल दराने हमीभाव जाहीर केला आहे़

१ मे ते ३० जूनपर्यंत भरडधान्यांची खरेदी केली जाणार होती, परंतु राज्यात कुठेही भरडधान्याची खरेदी सुरू झालेली नाही़ . वरिष्ठ पातळीवरून अद्यापपर्यंत खरेदीचे आदेश मिळालेले नाहीत़. एकरी किती शेतमाल घ्यावा हे देखील सूचित करण्यात आलेले नाही़. त्यामुळे एका शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त किती माल खरेदी करावा हे मात्र अद्यापही गुलदस्तात आहे़

गेल्यावर्षी रब्बीचे उत्पादन हाती येताच कोरोनामुळे टाळेबंदी झाली़ शेतकऱ्यांना उत्पादित शेतमाल दोन महिने घरात सांभाळून ठेवावा लागला़ यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते़ मात्र, यंदा चांगले उत्पन्न आले तर पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी त्रास सहन करावा लागत आहे़. कडक ऊन असतानादेखील शेतकरी उन्हाची पर्वा न करता मार्केट आवारात वाहनांची रांगा लावून थांबलेले असतात़. मात्र, यावर्षी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़

मार्केट सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना या वेळेत आपले धान्य विक्रीसाठी आणणे शक्य होत नाही़ त्याचा परिणाम धान्याची आवक मंदावली आहे तसेच भावातही काहीशी घसरण झाली आहे़

बाजारभाव कमी

येथील मार्केटला मका १ हजार ३००, ज्वारीला १ हजार ५० व गहू १ हजार ५२६ रुपयांप्रमाणे खरेदी केला जात आहे़ गरजू शेतकरी हमीभावाकडे दुर्लक्ष करून मिळेल त्या भावाने शेतमाल विक्री करत आहे़ मालाची विक्री केल्यानंतर शेती उपयोगी साहित्य व बी-बियाणांची खरेदी करताना शेतकरी दिसत आहे़ हमीभावापेक्षा मका ५००, ज्वारी १६०० तर गहू ३०० रुपये कमी भावाने खरेदी केला जात आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत शेतमाल गरजेअभावी विकावा लागत आहे़

Web Title: Waiting for farmers to buy coarse grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.