Vidhan Sabha 2019: अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेर्पयत वाट बघू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:15 IST2019-10-02T13:11:54+5:302019-10-02T13:15:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाही अशी अपेक्षा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या तारखेपयर्ंत वाट ...

Wait till the last date for filing the application | Vidhan Sabha 2019: अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेर्पयत वाट बघू

Vidhan Sabha 2019: अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेर्पयत वाट बघू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाही अशी अपेक्षा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या तारखेपयर्ंत वाट बघू. त्यानंतर जनतेशी विचार विनिमय करून निर्णय घेवू. मात्र लढायचा निर्णय पक्का  असल्याची भावना डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी आयोजित कार्यकत्र्याच्या मेळाव्यात व्यक्त केली.
मेळाव्याला किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहूल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, चंदनसिंग राजपूत, जि.प.सदस्य संजय पाटील राजेंद्र गिरासे, किरण दलाल, अॅड.अमित जैन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात भाजपचे तालुकाध्यक्ष राहूल रंधे यांनी  आवजरून उपस्थित राहून अद्यापही आपल्या पक्षाकडून अपेक्षा असल्याचे सांगितले. अजूनही आपण पक्षश्रेष्ठींकडे डॉ.ठाकूर यांची उमेदवारीची मागणी करीत आहोत. पक्षाने विचार केला नाही तर आपणही पक्षाचा विचार न करता डॉ. ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सवरेत्तपरी प्रय} करणार आहोत. तालुक्यातील जनता डॉ.ठाकूर यांच्या पाठीशी असून ती कोणाच्याही दबावाला, आमिषाला बळी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केले. यावेळी मिलींद पाटील, प्रेमकुमार चौधरी, रणजित शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
 

Web Title: Wait till the last date for filing the application