वडजाई रस्त्याच्या कामाला सुरुवात, ६५ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:02+5:302021-09-07T04:43:02+5:30
वडजाई रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली होती त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत होते. नागरिकांना त्या रोड वरून जातांना लहान ...

वडजाई रस्त्याच्या कामाला सुरुवात, ६५ लाखांचा निधी मंजूर
वडजाई रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली होती त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत होते. नागरिकांना त्या रोड वरून जातांना लहान मोठे खड्डे व या सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. शहराचे आमदार फारुख शाह यांनी वडजाई रोड कॉर्नर ते अक्सा नगर पर्यंतचा नविन रस्ता डांबरीकरण आणि काँक्रीट गटार करणे कामासाठी बांधकाम विभागाच्या विशेष निधीतून ६५ लक्ष रुपये मंजूर करू आणले. आमदार फारूक शाह यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुन्नाशेठ मुकादम होते. आभार प्रदर्शन वासीम अक्रम यांनी मानले. कामाच्या उद्घाटना प्रसंगी साबीर सैय्यद,साजीद साई,आमिर पठाण,डॉ.सर्फराज अन्सारी,डॉ.दीपश्री नाईक,सलिम शाह,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक गनी डॉलर,माजी नगरसेवक सत्तार शाह,नुरा ठेकेदार, शैबाज शाह,राजु लीडर,कैसर अहमद,आसिफ शाह,छोटू शेठ, जाकीरमुल्ला, रफिक शाह, वसीम अक्रम, शाहिद सर, सलमान खान,जुनेद पठाण, परवेज शाह, जैद अन्सारी, फारूक शेख, सउद सरदार, सउदआलम, फैसल, इंजि.अफसर शाह आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.