नेर येथे किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:56+5:302021-01-16T04:39:56+5:30
गावातील जिल्हा परिषद शाळा, धनाबाई कौतिक कन्या हायस्कूल, जिल्हा परिषद रायवट भाग, शाळा, नूरनगर भाग, याठिकाणी मतदान केंद्रे उभारली ...

नेर येथे किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत
गावातील जिल्हा परिषद शाळा, धनाबाई कौतिक कन्या हायस्कूल, जिल्हा परिषद रायवट भाग, शाळा, नूरनगर भाग, याठिकाणी मतदान केंद्रे उभारली होती. त्याठिकाणी दहा मतदान केंद्र होती. मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत प्रवेश नाकारण्यात आला होता. मतदान केंद्रावर वृद्धांना दुचाकी आणि चारचाकी वाहनाने आणण्यात आले.
मतदानाला विलंब
एका वॉर्डातून तीन उमेदवार निवडून द्यायचे असल्याने तीन वेळा बटन दाबून मतदान करावे लागत होते. मात्र, अनेक मतदार एक किंवा दोनच वेळा बटन दाबत असल्याने आवाज येत नव्हता. त्यामुळे ते गोंधळून जात होते. कर्मचाऱ्यांनी तीनदा बटन दाबण्याचे सांगितल्यावर मतदान होत होते. त्यामुळे अनेकदा वेळ लागत होता.
तगडा पोलीस बंदोबस्त
नेर गावाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यामुळे कोणताही वाद होऊ नये म्हणून मतदान केंद्रासह गावात काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच पोलीस अधिकारीही भेट देत होते.
जास्तीत जास्त मतदानासाठी आटापिटा
प्रत्येक उमेदवार आपापल्या वॉर्डातील मतदारांना मतदान करण्यासाठी बाहेर काढत होते. यासाठी मतदान केंद्रावर नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. यामुळे गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते.
पोलीस अधिकाऱ्यांची भेट
येथील मतदान केंद्राला अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, एसआरपीएफचे पीएसआय जोशी, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदींनी भेट दिली. येथे पीएसआय गजानन गोटे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत बोरसे, सुरेश पावरा, तसेच नेर पोलीस दूरक्षेत्राचे एएसआय प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रमोद ईशी, आठ जवान, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.