धुळे जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींसाठी ८ डिसेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:08 IST2019-11-07T12:07:49+5:302019-11-07T12:08:06+5:30
१६ पासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात

धुळे जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींसाठी ८ डिसेंबरला मतदान
आॅनलाइन लोकमत
धुळे :विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील ४२, साक्री तालुक्यातील १६, शिरपूर तालुक्यातील १४ व धुळे तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १६ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून, ८ डिसेंबर रोजी मतदार होणार असून, ९ रोजी मतमोजणी होणार आहे.
आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१९ या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात धुळे जिल्ह्यातही एकाही ग्रामपंचायतीची मुदत या काळात संपत नाही. मात्र अपात्रता, जात प्रमाणपत्र रद्द होणे, निधन होणे, राजीनामा देणे आदी विविध कारणामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या जागाांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासंदभार्तील निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ सदस्यपदासाठी पोटनिवडणुक होईल. निवडणुकीच्यादृष्टीने प्रशासनाकडून सर्व तयारी सुरू करण्यात आलेली आहे.
बुधवारी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामार्फत निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाली. दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपून १५ दिवस होत नाही, तोच पुन्हा ७३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत.