शिवसेनेकडून धुळ्यात महाआरोग्य शिबिराचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:37 IST2018-09-21T13:35:56+5:302018-09-21T13:37:34+5:30

हिरे वैद्यकीय महाविद्यालय : पदाधिकाºयांनी घेरले रुग्णालय प्रशासनाला

Vivebhadra from the Shiv Sena for the Meditation Camp in Dhule | शिवसेनेकडून धुळ्यात महाआरोग्य शिबिराचे वाभाडे

शिवसेनेकडून धुळ्यात महाआरोग्य शिबिराचे वाभाडे

ठळक मुद्देहिरे वैद्यकीय महाविद्यालयात शिवसेनेचे आंदोलनअटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांकडे दुर्लक्षतेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्या रविवारी धुळ्यात अटल महाआरोग्य शिबिर घेण्यात आले़ रुग्णांना मोफत आणि दर्जेदार सुविधा देण्यात येतील असे सांगण्यात आले होते़ पण, शिबिरानंतर मात्र त्याच रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी वाभाडेच काढले़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना निवेदन सादर करुन रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी लक्षात आणून दिले़ पुरेशा सुविधा न मिळाल्यास यानंतर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला़ आंदोलनानंतर अटल महाआरोग्य शिबिराचे झळकत असलेले पोस्टर देखील काही कार्यकर्त्यांनी फाडून निषेध नोंदविला़ 
 

Web Title: Vivebhadra from the Shiv Sena for the Meditation Camp in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.