सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग, तापी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:55 IST2020-08-14T12:54:14+5:302020-08-14T12:55:02+5:30

धुळे पाटबंधारे विभाग : ६ दरवाजे १ मीटरने उघडले

Visarga from Sulwade Barrage, a warning to the people of Tapi river | सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग, तापी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग, तापी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

धुळे : सुलवाडे मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तापी नदीपात्रात पाण्याची आवक वाढली असल्याने सुलवाडे बॅरेजच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे़ जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहेत़ त्यातून ७५ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग तापीत होत आहे़ परिणामी तापीची पातळी वाढत असल्याने सुलवाडे बॅरेजमधून १८ हजार ६२१़६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे़ या बॅरेजचे ६ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे़ पाण्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाच्या खालच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आल्याचे धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी दिलेला आहे़

Web Title: Visarga from Sulwade Barrage, a warning to the people of Tapi river

टॅग्स :Dhuleधुळे