बेटावद गावात मोबाईल टाॅवरला गावकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:24+5:302021-07-14T04:41:24+5:30
धुळे : शिंदखेडा तालुक्यात बेटावद गावात एका खासगी कंपनीचा मोबाईल टाॅवर उभारण्याचे काम सुरू असून, या टाॅवरला विरोध करण्यासाठी ...

बेटावद गावात मोबाईल टाॅवरला गावकऱ्यांचा विरोध
धुळे : शिंदखेडा तालुक्यात बेटावद गावात एका खासगी कंपनीचा मोबाईल टाॅवर उभारण्याचे काम सुरू असून, या टाॅवरला विरोध करण्यासाठी गावातील २५ कुटुंबांनी ग्रामपंचायतीकडे हरकत नोंदविली आहे. तसेच ग्रामसभेचा ठराव देखील केला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, बेटावद ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुवालाल श्रावण माळी यांच्या जागेवर मोबाईल टाॅवर उभारण्यास सुरुवात केली आहे. परंतु नियमानुसार त्यांनी किंवा कंपनीने ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही. याउलट मोबाईल टाॅवर उभारण्यास मंजुरी देऊ नये असा ठराव ग्रामसभेने केला आहे. शिवाय सुवालाल माळी यांना ४ जून रोजी नोटीसही बजावली आहे. तसेच मोबाईल कंपनी प्रशासनालादेखील १७ जून रोजी ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. पोलीस प्रशासनालादेखील ३० जूनला पत्र देण्यात आले आहे. गावाच्या पोलीस पाटील यांनादेखील २ जुलैला पत्र देण्यात आले आहे.
गावकऱ्यांचा विरोध असतानादेखील सुवालाल माळी यांनी मोबाईल टाॅवरचे साहित्य जमवून टाॅवरच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सदर टाॅवरचे काम बंद करून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर सुपडू धुडकू माळी, निंबाबाई शालीग्राम माळी, भटू माळी, वसंत माळी, रोहिदास माळी, लोटण माळी, सुभाष माळी, नीलेश देशमुख, सुनील माळी, शांताराम सोनार, नारायण माळी, अशोक देशमुख, साहेबराव निंबा माळी, साहेबराव बाबू माळी आदींच्या सह्या आहेत.