धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्यास ग्रामस्थांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:21 IST2020-08-05T11:21:20+5:302020-08-05T11:21:54+5:30
दोंडाइचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्यास ग्रामस्थांनी पकडले
आॅनलाइन लोकमत
मालपूर (जि.धुळे) :महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या संशयित आरोपीस ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी पकडून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. पोलीस गावात आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती नदी काठावरील महिला शौचास गेली असता, सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी रवींद्र राजेंद्र गोसावी (२८) याने पिडीत महिलेचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यानंतर भयभीत महिलेने आरडाओरड केली असता संशयित अंधाराचा फायदा घेवुन फरार झाला. त्या संशयिताला ग्रामस्थांनी सकाळी पकडुन ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यावेळी ग्रामपंचायत चौकात बघ्याची मोठी गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती दोंडाईचा पोलिसांना दिली असता सकाळी १०वाजता पोलीस गावात येत त्यांनी संशयित आरोपीला ग्रामपंचायत कार्यालयातुन ताब्यात घेवून दोंडाईचा पोलीस ठाण्यात नेले. तेथे पिडिताच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र राजेंद्र गोसावी विरुध्द भा. द. वि. कलम३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद चौधरी करीत आहेत.