संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी गावनिहाय दक्षता समिती स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:28+5:302021-06-09T04:44:28+5:30

साक्री तालुक्यातील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठक घेण्यात आली. ...

A village-wise vigilance committee will be set up to prevent a possible third wave | संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी गावनिहाय दक्षता समिती स्थापन करणार

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी गावनिहाय दक्षता समिती स्थापन करणार

साक्री तालुक्यातील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात तालुकास्तरावर गावातील सामाजिक कामात अग्रेसर असलेले सामजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शाखाप्रमुख व गटप्रमुख अशी सर्व समावेशक दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे. समितीच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष व सदस्य कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील तसेच भविष्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, तालुकानिहाय उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रावर सदर समिती रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीने प्रयत्न करावे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी लसीकरणाची गती वाढवून लसीकरण वाढविण्यावर सूचना देण्यात आल्यात. बैठकीत साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक तालुका प्रमुख पंकज मराठे, चंद्रकांत म्हस्के यांनी केले. सदर बैठकीत उपजिल्हाप्रमुख आधार हाके, भुपेश शहा, तालुकाप्रमुख धनराज पाटील, हिम्मत साबळे, डॉ.तुळशीराम गावित, अमोल सोनवणे, देवराम माळी, विलास चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: A village-wise vigilance committee will be set up to prevent a possible third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.