अतिवृष्टीग्रस्तांसाठी गावागावात मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:13 IST2019-11-13T12:12:06+5:302019-11-13T12:13:06+5:30
नेर : सेनेच्या बैठकीत हिलाल माळी यांची माहिती

Dhule
नेर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे, पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व पीक कर्जासंदर्भातील अडचणीसंदर्भात शिवसेना पक्षाच्यावतीने गावागावात मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात नेर गटाची बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी सेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, सरपंच शंकरराव खलाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भदाणे गावचे सरपंच बापू मालचे, भगवान पाटील, वसंत देशमुख, भिला माळी आदी उपस्थित होते. दरम्यान, १३ रोजी नेर येथील गांधी चौक, बाजारपेठ चौक, महात्मा फुले चौक येथे शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.