VffTfa¸f²¹fZ ¦fbaªf »fZ QZVf · föYe´fSX ¦fe ° ffa¨fZ ÀfcS | शाळांमध्ये गुंजले देशभक्तीपर गीतांचे सूर
dhule

धुळे : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात पार पडले. संस्था, संघटनांतर्फेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्यासह नाटिकांचे सादरीकरण केले.
शिरपूर तहसील कार्यालय
शिरपूर- येथील तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी डॉ़विक्रांत बांदल यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी आमदार आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, तहसिलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, आरसीपी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नायब तहसिलदार गणेश आढारी, सुदाम चौरे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते़
शिरपूर शासकीय कार्यालये
शिरपूर- येथील पाचकंदिल चौकात नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ तर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ पंचायत समितीमध्ये सभापती सत्तारसिंग पावरा, मार्केट कमिटीत सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ़धु्रवराज वाघ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वर्शी येथे ध्वजारोहण
वर्शी- ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच अरुणबाई सुरेश माळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद मराठी शाळा नं.१ व २ येथे जि.प. सदस्या ज्योती देविदास बोरसे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. शंकर पांडू माळी माध्यमिक व रुखमाबाई शंकर माळी उच्च माध्यमिक विद्यालयात उपसरपंच रोहिदास ढोले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
एन.डी. मराठे विद्यालय
शिंदखेडा- शहरातील आण्णासाहेब एन.डी. मराठे विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बालरोग तज्ञ डॉ.सचिन ढोले यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैनिक रामकृष्ण माळी, सावन पाटोळे, अभिजीत पवार, निवृत्त सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, प्रमोद गुरव, डॉ.हितेंद्र पवार यांच्यासमवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव मराठे, मधुकर सैंदाणे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक हर्षल कापुरे, सूत्रसंचालन सतिष बागुल, संदीप देसले यांनी केले.

 

Web Title: VffTfa¸f²¹fZ ¦fbaªf »fZ QZVf · föYe´fSX ¦fe ° ffa¨fZ ÀfcS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.