वाहनाची दुचाकीला धडक, तरुण ठार

By Admin | Updated: February 27, 2017 00:58 IST2017-02-27T00:58:45+5:302017-02-27T00:58:45+5:30

धुळे : भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुण ठार झाला़

Vehicle bikes, young killers | वाहनाची दुचाकीला धडक, तरुण ठार

वाहनाची दुचाकीला धडक, तरुण ठार


धुळे : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुण ठार झाला़ ही घटना शनिवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिरापुढे घडली़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़
सोपान शिवाजी मोरे (वय १८, रा़ दह्याणे, ता़ धुळे) असे  मयत तरुणाचे नाव आहे़ तो २५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीने दह्याणे येथून झोडगे येथे जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली़ त्यात तो गंभीर जखमी झाला़ त्याला लक्ष्मण अशोक सोनवणे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले़ मात्र उपचार सुरू असताना त्याचा रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ डॉ़ हर्षल सोनवणे यांनी तपासणी करून सोपान मोरे याला मृत घोषित केले़ याबाबत पोलीस कॉन्स्टेबल एस़ डी़ पाटील यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे़ तपास पो़हेक़ॉ. आऱ ए़ जाधव करीत आहेत़

Web Title: Vehicle bikes, young killers